रेल्वे स्थानकावरील अवैध जाहिराती गायब

By Admin | Updated: November 11, 2014 23:41 IST2014-11-11T23:40:23+5:302014-11-11T23:41:20+5:30

राजर्षी शाहू छत्रपती टर्मिनल्सवर साफसफाईबाबत प्रशासनाच्यावतीने तीन शिफ्टमध्ये वीस कर्मचाऱ्यांची नेमणूक

Illegal ads on the railway station are missing | रेल्वे स्थानकावरील अवैध जाहिराती गायब

रेल्वे स्थानकावरील अवैध जाहिराती गायब

कोल्हापूर : रेल्वे स्थानकाच्या भिंतीवर व रेल्वेवर अवैधरीत्या विविध कंपन्या, व्यवसायाची मोफत जाहिरात करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन कारवाईचा बडगा उगारत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर अवैधरीत्या जाहिरात लावल्याबद्दल चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड घेण्यात आला. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू छत्रपती टर्मिनल्सही सज्ज झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी बेपत्ता, व्यवसाय करा, अशा जाहिराती सध्या तरी गायब झाल्याचे दिसतात.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाबाहेरील भिंतीवर व रेल्वेच्या डब्यांवर अनेक कंपन्यांच्यावतीने मोफत जाहिराती लावल्या जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकांचे विद्रुपीकरण होते. सध्या रेल्वे प्रशासन स्वच्छतेबाबत दक्षता घेताना दिसत आहे. राजर्षी शाहू छत्रपती टर्मिनल्सवर साफसफाईबाबत प्रशासनाच्यावतीने तीन शिफ्टमध्ये वीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अवैधरीत्या जाहिरात लावल्यांवर कडक कारवाईसाठी प्रशासनाच्या वतीने परिसर व रेल्वेची पाहणी केली जाते.

रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेगाडीवर कोणत्याही प्रकाराची विनापरवानगी जाहिरात लावलेल्या नाहीत. आमच्यावतीने वेळच्या वेळी अशा जाहिराती कोण लावते यासंबंधीची पाहणी केली जाते.
- पी. के. भाकर, उपनिरीक्षक

Web Title: Illegal ads on the railway station are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.