सकाळी दुर्लक्ष, सायंकाळी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:18+5:302021-04-16T04:25:18+5:30
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन असतानाही येथील मोटारसायकलस्वार व नागरिक रस्त्यावर बिनदिक्कतपणे फिरताना दिसले. अनेक मुख्य ठिकाणी एखाद-दुसरा ...

सकाळी दुर्लक्ष, सायंकाळी कारवाई
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन असतानाही येथील मोटारसायकलस्वार व नागरिक रस्त्यावर बिनदिक्कतपणे फिरताना दिसले. अनेक मुख्य ठिकाणी एखाद-दुसरा पोलीस दिसत होता. त्यामुळे आणखीनच नागरिक दिवसभर रस्त्यावर दिसून आले. दरम्यान, सायंकाळी अचानकच पोलिसांनी मोटारसायकलवरून विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांचे कडक निर्बंध लावून लॉकडाऊन घोषित केला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिक विनामास्क, तर अनेक ठिकाणी जमावने फिरत असताना पाहावयास मिळाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा दंडात्मक कारवाई सुरू केली. सुमारे १५० मोटारसायकली जप्त केल्या.
फोटो ओळी
१५०४२०२१-आयसीएच-१०
इचलकरंजीत मोटारसायकलवरून बिनदिक्कतपणे फिरणाऱ्यांवर रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई केली.
१५०४२०२१-आयसीएच-११
पोलिसांनी १५० मोटारसायकली जप्त केल्या.