‘इफ्तार पार्टी’मुळे हिंदू-मुस्लिममध्ये एकोपा
By Admin | Updated: July 3, 2016 00:44 IST2016-07-03T00:44:16+5:302016-07-03T00:44:16+5:30
सतेज पाटील : काँग्रेस पक्ष व मुस्लिम बोर्र्डिंंगच्यावतीने आयोजन

‘इफ्तार पार्टी’मुळे हिंदू-मुस्लिममध्ये एकोपा
कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. मुस्लिम बोर्डिंग, दसरा चौक येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी सायंकाळी आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.
समाजात बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मांतील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल.
मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले; तर प्रशासक कादरभाई मलबारी यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्त्व विशद केले. उपाध्यक्ष आदिल फरास यांनी आभार मानले.
यावेळी महापौर अश्विनी रामाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, ‘भाकप’चे चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, अॅड. पंडित सडोलीकर,
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, दुर्वास कदम, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, एस. के. माळी, संध्या घोटणे,
शेखर घोटणे, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंत मुळीक, अवधूत पाटील, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, प्रमोद बुलबुले, साजीद खान व मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. ( प्रतिनिधी)