शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारू विकल्यास सातबाऱ्यावर बोजा, मालमत्ता सील करणार; कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने केला ठराव.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:46 IST

वादावादीमुळे काही काळ तणावाचे वातावरण

कुरुंदवाड : गावात बेकायदेशीर दारू विक्री करताना अथवा अवैध व्यवसाय करताना सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून दंडाचा बोजा सातबाऱ्यावर नोंद करण्याचा व त्यांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामसभेत घेण्यात आला.या ठरावाची नक्कल गावचावडीसमोर डिजिटल फलक करून लावण्याचा तसेच गावचावडी चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद करण्याबाबत चर्चेतून निर्णय घेण्याचा ठराव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत आयत्या वेळच्या विषयावर हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच शर्मिला टाकवडे होत्या.दरम्यान, दारूबंदी, गावचावडीसमोरील सार्वजनिक स्वच्छतागृह हटविणे, सासणे गल्लीतील तुंबलेल्या गटारीवरून ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन व तक्रारदार यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला.गावचावडीसमोर शासकीय योजनांना मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. लिपिक जब्बार नालबंद यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. ग्रामसेवक व्ही. ए. शेवरे, सरपंच टाकवडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना उपस्थित नागरिकांनी मंजुरी दिली. मात्र, आयत्या वेळच्या विषयात सचिन कोळी यांनी दारूबंदीचा ठराव असताना राजरोसपणे बेकायदेशीर दारू विक्री केली जात. ते बंद करावे नाहीतर आम्हाला रीतसर परवानगी द्यावी, असा विषय येताच वादावादीला सुरुवात झाली. अखेर सरपंच टाकवडे यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदार शांत झाले. यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू, शक्ती पाटील, बाबासो हेरवाडे, आरिफ मुजावर, तेजस्विनी पाटील, ललिता जाधव, रेश्मा चौधरी, मालन कुंभार, अनिता मोरडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतliquor banदारूबंदी