शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ज्यांना जायचं त्यांनी आताच निर्णय घ्या, फसवाल तर करेक्ट कार्यक्रम करू; सतेज पाटील यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:58 IST

निर्धार मेळाव्यात काँग्रेसचे मिशन महापौर

कोल्हापूर : राजकारणात माणसं येतात आणि जातात, मात्र माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील आहे. ज्यांनी निर्णय घ्यायचा त्यांनी घेतलाय, ज्यांना जायचं आहे त्यांनी आताच निर्णय घ्यावा. मात्र, ऐन निवडणुकीत हिकडं तिकडं कराल तर त्या प्रभागात येऊन तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, असा गर्भित इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी दिला.गेलेल्यांबाबत मी विचार करत नाही, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कशालाच भीत नाही, या शब्दांत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनाही फटकारले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा शनिवारी काँग्रेस कमिटीत निर्धार मेळावा झाला. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते.सतेज पाटील म्हणाले, ज्यांना पदे मिळाली, त्यांनी माझ्याशी प्रामाणिक राहण्याची भूमिका ठेवावी. अनेकजण सोडून गेले असले तरी मी त्याचा विचार करत नाही. जनता माझ्यासोबत असल्याने मी संघर्ष करायला कधीच भीत नाही. त्यामुळे ज्यांना वेगळी भूमिका घ्यायची आहे त्यांनी आताच घ्यावी. निवडणुकीच्या आधी दहा दिवस काही वेगळा निर्णय घेऊन मला फसवाल तर तुमच्या प्रभागात येऊन तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय मी सोडणार नाही.शाहू छत्रपती म्हणाले, कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन काँग्रेसने केलेल्या कामाची माहिती देणे गरजेचे आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आतापासून तयारीला लागा. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर, दुर्वास कदम, भूपाल शेटे, आनंद माने, अमर समर्थ, तौफिक मुलाणी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी महापौर ॲड. महादेव आडगुळे, मारुतराव कातवरे, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, बाळासाहेब सरनाईक, दौलत देसाई, माजी महापौर भीमराव पवार, शोभा बोंद्रे, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, अश्विनी रामाणे, स्वाती येवलूजे, भारती पोवार, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, वैभवी जरग, सूरमंजिरी लाटकर आदी उपस्थित होते.प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करणारयेणाऱ्या निवडणुकीत प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले. प्रभागातील समस्या जाणून घेऊन प्रत्येक प्रभागात काय आवश्यक आहे याची सोडवणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवाचज्यांना पदे दिली त्यांनीच सत्ता नसतानाच्या काळात तुम्हाला सोडले, कोण निष्ठावंत आणि कोण गद्दार हे आता ठरले असून पदे देऊनही, सत्तेचा लाभ घेऊनही त्यांनी गद्दारी केली त्यांना आता कायमचा धडा शिकवाच, अशी मागणी कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्याकडे केली.