शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

‘सोर्स कोड’ असेल, तर देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:59 IST

पुढील वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च येऊ नये; पण असे काहीच झालेले नाही; कारण दरवर्षी वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च दिला जातो. त्या संगणक प्रणालीत काही बदल करायचा असेल, तर त्या कंपनीला त्याचे वेगळे पैसे दिले जातात. मग, महागातील सोर्स कोड विद्यापीठाने विकत घेतलाच का? हा प्रश्न उपस्थित होतो.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाला पत्र देऊनही कार्यवाही नाही तंत्रज्ञान हाताळण्याबाबतचा विचार नाही

संतोष मिठारी ।कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील काही संगणक प्रणालींचा सोर्स कोड विकत घेऊनही त्यावर वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी करण्यात आला आहे? त्यासह प्रणालीत बदल केल्यास त्याचा खर्च स्वतंत्रपणे संबंधित कंपनीला देण्यात आला असल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.

परीक्षा विभागातील कामकाजासाठी वापरण्याकरिता संगणक प्रणाली विकत घेताना तिचा सोर्स कोड घेतला आहे. हा कोड विकत घेताना असा विचार असतो की, जर भविष्यात त्या संगणक प्रणालीमध्ये काळानुसार काही बदल करायचा असेल, तर तो करता येईल. पुढील वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च येऊ नये; पण असे काहीच झालेले नाही; कारण दरवर्षी वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च दिला जातो. त्या संगणक प्रणालीत काही बदल करायचा असेल, तर त्या कंपनीला त्याचे वेगळे पैसे दिले जातात. मग, महागातील सोर्स कोड विद्यापीठाने विकत घेतलाच का? हा प्रश्न उपस्थित होतो. ज्यावेळी सोर्स कोड विकत घेतला जातो, त्यावेळी त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरायचे, हा विचार करावा लागतो.

आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती आहे का आणि त्यांना ते हाताळता येते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, विद्यापीठात त्याचा विचार केला नसल्याचे दिसून येते. आठ वर्षांनंतरही आर्थिक खर्च करून काही कर्मचाऱ्यांना या प्रणालींचे तंत्रज्ञान शिकविण्यात आले आहे. त्याचा विद्यापीठाला फायदा झालाआहेका?याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखे चित्र आहे.

धक्कादायक उत्तरेपीएच.डी. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीतील त्रुटी, चुकांमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव झाली. त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम गेल्या दीड वर्षापासून केले असल्याचे आपटेनगर येथील नागरिक अभिजित पोतदार यांनीसांगितले.

संगणक प्रणाली तयार करण्यासाठी एका कंपनीला किती कालावधी दिला होता? प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या कंपनीने कागदपत्रे जमा केली का? पूर्णत्वाची चाचणी झाली का? याबाबतची माहिती मी माहिती अधिकाराखाली मागविली. त्यावर ही धोरणात्मक बाब असल्याने उत्तर देऊ शकत नाही.

कोणतीही कागदपत्रे आढळून येत नाहीत, अशी धक्कादायक उत्तरे मिळाली. त्रास झालेल्या आणखी काही विद्यार्थ्यांसह मिळून आम्ही संगणक केंद्रातील कामकाजाबाबतची माहिती कुलगुरू, प्र-कुलगुरू,परीक्षा मंडळाचे संचालक, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठ प्रशासनाला पत्राद्वारे दिली; पण त्यावरकाहीच कार्यवाही झाली नाही. त्रुटी दूर होऊन संगणक केंद्राचे कामकाज सक्षमपणे होऊन विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा, इतकीच अपेक्षा आहे.

खराब मदरबोर्ड, हार्डडिस्कची माहितीच नाहीया संगणक केंद्रामार्फत विद्यापीठातील विविध विभागांमधील संगणकांच्या दुरुस्तीचे देखील काम चालते. संगणकामध्ये बिघाड झाल्यास त्याचा मदरबोर्ड अथवा हार्डडिस्क खराब झाल्याचे सांगितले जाते.शिवाय ते संबंधित विभागाला नवीन खरेदी करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे किती मदरबोर्ड, हार्डडिस्क खराब झाल्या, बदलल्या याची नोंद ठेवण्याचे काम संगणक केंद्राला करावे लागत नाही. शिवाय खराब झालेले मदरबोर्ड, हार्डडिस्कचे पुढे काय होते? त्याची माहिती दिली जात नाही. हा प्रकार गेल्यावर्षी विद्यापीठाला प्राप्त झालेल्या एका निनावी पत्रामुळे समोर आला, तरीही संगणक केंद्राच्या या कारभारात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर