बैठक न झालेस सर्फनाला धरणाचे काम बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:36+5:302021-02-05T07:07:36+5:30

उपअभियंता एस. वाय. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला बैठक लावण्याबाबत निवेदनासह लेखी पत्र दिले असून बैठकीची तारीख गुरुवारपर्यंत संघटनेला कळविली ...

If there is no meeting, Sarfana will stop work on the dam | बैठक न झालेस सर्फनाला धरणाचे काम बंद करणार

बैठक न झालेस सर्फनाला धरणाचे काम बंद करणार

उपअभियंता एस. वाय. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला बैठक लावण्याबाबत निवेदनासह लेखी पत्र दिले असून बैठकीची तारीख गुरुवारपर्यंत संघटनेला कळविली जाईल, असे सांगितले. कॉ. संपत देसाई म्हणाले, धरणग्रस्तांना गृहीत धरून प्रशासन तसा व्यवहार करणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. धरणाचे काम बंद पाडण्यात आम्हाला रस नाही पण पुनर्वसनाच्या कामात होणारी हयगयही चालू देणार नाही. त्यामुळे दहा-बारा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिले होते. निवेदनातील प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी बैठक अपेक्षित आहे. पूर्वसूचना देऊनही आम्ही येथे आलो आहोत.

उपअभियंता यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनीवरील चर्चेनंतर गुरुवारपर्यंत बैठकीची तारीख न मिळाल्यास धरणाचे काम कधीही बंद करू, असे सांगून आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी हरी सावंत, गोविंद पाटील, बाळू डेळेकर, बाबू कवीटकर, नारायण भडांगे, विष्णू मांजरेकर, धोंडिबा सावंत, एकनाथ गुंजाळ, श्रावण पोवार, बाबू ढोकरे उपस्थित होते.

Web Title: If there is no meeting, Sarfana will stop work on the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.