शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रदीप नरकेंनी कुंभी कारखान्याचे वाटोळे केले, परिवर्तन न झाल्यास देवही वाचवणे अशक्य; बाळासाहेब खाडेंचा आरोप

By राजाराम लोंढे | Updated: February 9, 2023 14:44 IST

‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्ज

राजाराम लोंढेकोल्हापूर : कुंभी कासारीची आम्ही सत्ता सोडताना एक रुपयाचेही कर्ज नव्हते. मात्र, गेल्या अठरा वर्षांत चंद्रदीप नरके यांनी कारखान्यावर तब्बल ३०० कोटींचे कर्ज केले. कारखान्याला लागलेली घरघर थांबवण्यासाठी परिवर्तनाची गरज असून तसे झाले नाहीतर ‘कुंभी’चे खासगीकरण होण्यापासून देवही वाचवणार नाही, असा इशारा देत स्वत:च्या आमदारकीसाठी नरके यांनी चांगल्या कारखान्याचे वाटोळे केल्याचा घणाघाती आरोप विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते बाळासाहेब खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.‘कुंभी’च्या सभासदांनी १९९९ ते २००४ या कालावधीत आमच्याकडे सत्ता दिली, त्यावेळी २८ कोटींचे शॉर्ट मार्जिन होते आणि एक लाख ९५ हजार टन साखर शिल्लक होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार करत कारखाना कर्जमुक्त केला. मात्र, पाच वर्षांत पाच अध्यक्ष केले म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी गेल्या १८ वर्षात कारखाना डबघाईला आणला. ‘दालमिया’सह परिसरातील साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प ‘बीओटी’वर केला, ते आता कर्जमुक्तही झाले. 

मात्र, ‘कुंभी’ने कर्ज काढून प्रकल्प उभा केल्याने आर्थिक ताण आला. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, ऊसतोडणी व वाहतूकदारांचे पैसे वेळेत मिळेनात. कामगार सोसायटीचे १८ कोटींचे कर्ज थकल्याने कर्मचाऱ्यांच्या ठेवी अडकल्याने कर्मचारी दुहेरी संकटात सापडले. आम्ही सुरू केलेल्या निवासी शाळेत गेल्या १८ वर्षांत एक इयत्ताही चंद्रदीप नरकेंना जोडता आली नाही. मुले अक्षरश: खुराड्यात असून स्वत:च्या मालकीचे मात्र कारखान्याच्या पैशावर सुरू असलेल्या विद्यानिकेतनमधून ही मंडळी लाखो रुपये घरी घेऊन जात असल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला.

कामगारांवर रोजगारला जाण्याची वेळ‘कुंभी’च्या इतिहासात कामगारांचा पगार कधी थकला नाही. सध्या अकरा महिन्याचा पगार नसल्याने कामावर रजा टाकून दुसरीकडे रोजगाराला जाण्याची वेळ कामगारांवर आणणाऱ्यांना ‘कुंभी’तून हद्दपार करा, असे आवाहन बाळासाहेब खाडे यांनी केले.‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्जयापूर्वी राज्य बँक आर्थिक स्थिती पाहूनच ‘कुंभी’ला कर्ज देत, कारखाना जिल्हा बँकेकडे आल्यामुळेच उसाची बिले देत आहेत. यासाठी आमदार पी.एन. पाटील व आमदार विनय काेरे यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळेच कर्ज मिळाल्याचे खाडे यांनी सांगितले.खुद्द तोडीमुळेच कारखाना सुरूकारखान्याचे ऊस तोडणी पाळीपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप आडसाली लागणी शिवारात उभ्या आहेत. तोडणी व वाहतूकदारांची बिले व कमिशन वेळेत मिळत नसल्याने कोणी ऊस तोडेना. सध्या केवळ खुद्द तोड सुरू असल्यानेच कारखाना सुरू असल्याचे खाडे यांनी सांगितले.

घरच्यांचाही विश्वास गमावलाचंद्रदीप नरके हे ‘कुंभी’ वाचवू शकत नसल्याने त्यांनी सभासदांचा विश्वास गमावला आहेच, आता घरच्यांचाही विश्वास गमावला आहे. ‘शाहू’ आघाडीच कारखाना वाचवू शकते, हा विश्वास ज्येष्ठ नेते अरुण नरके यांना असल्याने त्यांनी पाठिंबा दिल्याचे बाळासाहेब खाडे यांनी सांगितले.सत्ता द्या, हे करतो....

  • काटकसरीच्या कारभारातून ‘कुंभी’ कर्जमुक्त करू.
  • अध्यक्षांसह संचालकांच्या वाहनांवर एक रुपयाही खर्च करणार नाही.
  • शेतावरील कर्मचाऱ्यांना कारखान्यात आणू.
  • ‘कुंभी’ची शाळा अद्यावत करू.
  • ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम
  • ऊस विकास योजना राबवू.
  • बेणे प्लॉट करणार. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक