शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Maratha Reservation: संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:27 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले

कोल्हापूर : ‘मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने जुन्याच मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकारने तारखा दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर खासदार संभाजीराजेंनी त्या त्या तारखेला शब्द देणाऱ्यांचा शर्ट पकडावा,’ असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.संभाजीराजेंनी ज्या मागण्या आता केल्या होत्या, त्या कोणतीही खळखळ न करता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या होत्या. दोन वर्षे सलग ६५०- ६५० कोटी रुपयांचा निधी दिला होता; परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच या मंजूर केलेल्या योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे संभाजीराजे उपोषणास बसले.महाविकास आघाडी सरकारने नव्याने काही केलेले नाही, जुन्या बंद झालेल्या योजनांना नव्याने मंजुरी दिली एवढेच आहे. तरीही राजे हे तितकं सोपं नाही. तुम्हाला ज्या तारखा दिल्या आहेत, त्या तारखेपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर शब्द देणाऱ्यांचे शर्ट पकडा, असे पाटील म्हणाले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी, आमचा या आंदोलनास पाठिंबा राहील. प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकाच वेळी राज्यात एक हजार आंदोलने केली आहेत.राज्यपालांच्या वक्तव्यावर मात्र गप्प...राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांनी यावर खुलासा केला असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. राज्यपाल जुना इतिहास वाचणारे आहेत, असे पाटील यांनी सांगितले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीchandrakant patilचंद्रकांत पाटील