मराठा आरक्षणासाठी शरद पवार पुढाकार घेणार असतील, तर आम्ही त्यांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:32+5:302021-05-31T04:19:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी :मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार ...

If Sharad Pawar is going to take the initiative for Maratha reservation, then we are behind him | मराठा आरक्षणासाठी शरद पवार पुढाकार घेणार असतील, तर आम्ही त्यांच्या पाठीशी

मराठा आरक्षणासाठी शरद पवार पुढाकार घेणार असतील, तर आम्ही त्यांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी :मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार पुढाकार घेऊन प्रामाणिक प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे मत आज भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर (ता. भूदरगड) येथे गरीब व गरजू लोकांना धान्य वाटप करण्यासाठी पाटील आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी भूदरगड तालुका सकल मराठा समाज, अखिल भारतीय मराठा महासंघ भूदरगड शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, बहुतांशी मराठा समाज हा गरीब आहे, समाजाला फडवणीस सरकारने आरक्षण मिळवून दिले होते. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास आताचे ठाकरे सरकार अपयशी ठरले, पण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास उशीर झाला असला, तरी उशिरा का होईना पण शरद पवार यांनी प्रयत्न करावा,त्यांच्या पाठीशी उभा राहू असे ठाम मत व्यक्त केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, नाथाजी पाटील, पार्थ सावंत, संदीप पाटील, नंदकुमार शिंदे, शक्तिजित पोवार, सुशांत माळवी, सचिन भांदिगरे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

खानापूर, ता. भूदरगड येथे गरिबांना धान्य वाटप करताना आमदार चंद्रकांत पाटील, सोबत प्रवीणसिंह सावंत, विद्या सावंत, संदीप पाटील, पार्थ सावंत आदी.

Web Title: If Sharad Pawar is going to take the initiative for Maratha reservation, then we are behind him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.