शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:22 IST

कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत

कोल्हापूर : शक्तिपीठ हटाव, कोल्हापूरला महापुरापासून बचाव, शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी देऊन येथील अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. आई अंबाबाई शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, उदं गं आई उदं, असा गजर आणि गणपतीची आरती करून करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घातले.शक्तिपीठ महामार्ग करताना पुन्हा भराव टाकावा लागणार आहे. असे झाले, तर बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी येईल. निम्मे कोल्हापूर महापुरात जाईल, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगलीसह बारा जिल्ह्यांतील जनतेचा विरोध आहे. मात्र, कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत. ते शक्तिपीठला समर्थन करून कोल्हापूरच्या महापुराची स्थिती आणखी गंभीर करणार आहेत. सध्याचा महामार्ग करताना मातीचा भराव टाकल्याने २०१९ साली जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आले होते. शक्तिपीठ महामार्ग करताना पुन्हा भराव टाकावा लागणार आहे.

वाचा-  शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती असे झाले, तर बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी येईल. निम्मे कोल्हापूर महापुरात जाईल. शक्तिपीठला उपमार्ग म्हणून कणेरीमठ ते जोतिबा असा एक नवा रस्ता करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान होणार आहेत. भोगावती, कासारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी भरावा टाकला, तर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबून राहणार आहे. यावेळी उद्धवसेनेचे विजय देवणे, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अजित पोवार आदी सहभागी झाले होते.

बालिश मागणी..राज्य सरकार नियोजित महामार्ग करणार आहे, म्हणून कर्नाटकातून चंदगडमार्गे महामार्ग करता येत नाही. तरीही कोणाला तरी खूश करण्यासाठी अज्ञानातून चुकीची आणि बालिश मागणी केली जात आहे, अशी टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली.