सतेज आले तर त्यांच्यासह ‘केडीसीसी’त पॅनेल
By Admin | Updated: April 11, 2015 00:08 IST2015-04-11T00:05:13+5:302015-04-11T00:08:56+5:30
पी. एन. पाटील : सत्तारूढ गटाचा ‘गोकुळ’ प्रचाराचा नारळ फुटला; दूध संघातून ‘तेच’ बाहेर गेले

सतेज आले तर त्यांच्यासह ‘केडीसीसी’त पॅनेल
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्येही आम्ही सतेज पाटील यांना बाजूला केलेले नव्हते. तेच बाहेर गेले. जिल्हा बॅँकेसाठी ते आले तर बरोबर घेऊन कॉँग्रेसचे पॅनेल बांधू, अशी माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचाराची सुरुवात शुक्रवारी अंबाबाई मंदिरात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मंदिराच्या गरुड मंडपात पी. एन. पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आमदार सत्यजित पाटील -सरुडकर, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, शशिकांत पाटील -चुयेकर प्रमुख उपस्थित होते.
प्रचाराच्या प्रारंभानंतर पत्रकारांशी बोलताना पी. एन. पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ दूध संघाचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहिल्यास संघाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत दूध उत्पादकांच्या जीवनात स्थैर्य आणले आहे. सामान्य दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून संघाने काम केले. संचालकांनी आपल्या अनुभवसंपन्न व अभ्यासू दृष्टिकोनातून ‘गोकुळ’चे नाव देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे काम केले. उत्पादकांना दर दहा दिवसांनी दुधाची बिले देत असताना जिल्हा बॅँकेत संघाच्या कोट्यवधींच्या ठेवी गुंतविल्या आहेत. आधुनिकतेचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या राजर्षी शाहू पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
जिल्हा बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तिथे तुमची भूमिका काय असणार, सतेज पाटील कॉँग्रेसच्या पॅनलमध्ये असणार का? असे विचारले असता, जिल्ह्णातील कॉँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेऊन जिल्हा बॅँकेबाबत निर्णय घेतला जाईल. सतेज पाटील आले तर त्यांनाही बरोबर घेऊन पॅनल तयार करू. ‘गोकुळ’मध्ये आम्ही त्यांना बाजूला केले नाही तेच बाहेर गेल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण नरके, अध्यक्ष दिलीप पाटील, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, सुरेश पाटील, पी. डी. धुंदरे, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, दीपक पाटील, राजेश पाटील, सदानंद हत्तरकी, विश्वास जाधव, अनुराधा पाटील, जयश्री पाटील, विलास कांबळे, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रच्शशिकांत पाटील यांची उपस्थितीाार प्रारंभाला आमदार महादेवराव महाडिक हे अनुपस्थित राहिले. राजाराम कारखान्याच्या प्रचारसभेत ते असल्याचे सांगण्यात आले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन विरोधी छावणीत गेलेले शशिकांत पाटील-चुयेकर प्रचाराच्या प्रारंभाला उपस्थित होते.
हा आमचा उद्योग नव्हे!
‘गोकुळ’चा कारभार सामान्य शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून आम्ही केला. नुसती कर्जे काढून संघ बंद पाडण्याचे उद्योग आम्ही केले नसल्याचा टोला पी. एन. पाटील यांनी विरोधकांना हाणला.