शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:28 IST

आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा

कोल्हापूर : गेले दोन दिवस खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत, त्यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले तर महाराष्ट्र पेटेल, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा सकल मराठा समाजाने रविवारी दिला. आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा जिजाऊ ब्रिगेडने दिला.

दसरा चौकात रविवारी दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण करण्यात आले. दिवसभरात विविध संघटना, सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी भेट देऊन पाठिंबा दिला.मुस्लीम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी म्हणाले, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, सरकारने निर्णय घेतला नाही तर त्याचे पडसाद उमटणार आहेत. कोणी राजकीय भांडवल न करता दसरा चौकात जास्तीत जास्त लोक सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा. समाजाच्या आडून कोणी स्वत:ची पोळी कोणी भाजू नये.

मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, सरकारला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत का? पंढरपूर, नाशिक बंद होते, मग आपण मागे का? आजपासून आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे. जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक म्हणाल्या, सरकार बेदखल करणार असेल तर आता वाट पाहात बसू नये, मंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालूया.

सचिन तोडकर म्हणाले, सरकारला मंगळवारपर्यंतचा अल्टीमेटम देतो, यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. बुधवारपासून जिल्ह्यात उद्रेक होईल. त्याचा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, दसरा चौकातील आंदोलन कायम राहणार आहे, सरकारला निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस आहे. तो घेतलाच नाही तर उद्या, मंगळवारी तयारी करून बुधवारी कोल्हापूर बंद केले जाईल. तेथून पुढे एल्गारला सामोरे जावे.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. मात्र, आघाडी सरकारला समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे.

यावेळी प्रसाद जाधव, ॲड. राजेंद्र कडदेशमुख, लता जगताप, सुनीता पाटील आदी उपस्थित होते.

बेळगाव पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, पंचायत समिती सदस्य सुनील अष्टेकर, भालचंद्र पाटील, पुंडलिक पावशे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

या संघटनांनी दिला पाठिंबा

संयुक्त रविवार पेठ, प्रहार जनशक्ती पक्ष, भीम ब्रिगेड संघटना, राजर्षी शाहू दिव्यांग संस्था, शिवाजी चौक तरुण मंडळ, हळदी, मराठा जागृत मंच, लिंगायत समाज संस्था, चित्रदुर्ग मठ, अंबाजी खामकर गुरुजी गृहनिर्माण संस्था

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती