शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:40 IST

भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते.

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी येत्या १० जूनला होऊ घातलेल्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्ष व या आघाडीला पाठिंबा दिलेल्या सर्व १६ अपक्षांनी पाठिंबा दिल्यास त्यांचा नव्याने राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते. उरण (जि. रायगड)चे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी सोमवारी त्यांच्या उमेदवारीस पाठबळ दिले आहे. बालदी मूळचे भाजपचे असून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांची संमती घेतल्याशिवाय त्यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीस बळ देणे शक्य नाही. त्यामुळे भाजपची भूमिकाही संभाजीराजे यांच्यासारठी पूरक राहते की काय, ही उत्सुकता आहे.३१ मे रोजी लढतीचे चित्र स्पष्ट होणारमहाराष्ट्र विधानसभेतून निवडून देण्याच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी २४ ते ३१ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ३१ मे रोजीच या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. संभाजीराजे यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पवार यांनी मनांत आणले तर ते महाविकास आघाडीला संभाजीराजे यांच्या पाठीशी उभी करू शकतात. तशा हालचालीही सुरू आहेत. महाविकास आघाडीतून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.पहिल्या पसंतीची ४२ मतांची गरजनिवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची ४२ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीचे तिघे निवडून आल्यावर त्यांच्याकडे २५ मते शिल्लक राहतात. या आघाडीला इतर पक्ष व अपक्ष मिळून १६ आमदारांचा पाठिंबा आहे. ती संभाजीराजे यांना मिळाल्यास त्यांचा विजय सोपा होऊ शकतो. परंतु त्यासाठी भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नसला तरच हे शक्य आहे. भाजपचे सध्या तीन खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी तीन उमेदवार उभे केल्यास आणि त्यातही तिसरा उमेदवार आर्थिक ताकदीचा दिल्यास या जागेची लढत चुरशीची होऊ शकते.

भाजपला १३ मतांची जोडणी करावी लागणार

भाजपला राज्यसभेतही संख्याबळ आवश्यक असल्याने ते तिसरा उमेदवार नक्की देतील असेच चित्र आहे. भाजपकडे त्यांची स्वत:ची २२ व अपक्षांची ७ अशी २९ मते शिल्लक आहेत. त्यांनाही तिसरी जागा निवडून आणायची झाल्यास १३ मतांची जोडणी करावी लागणार आहे.

महाविकास आघाडी

  • शिवसेना - ५६ (एक रिक्त)
  • राष्ट्रवादी - ५३
  • काँग्रेस - ४४
  • बहुजन विकास आघाडी - ०३
  • समाजवादी पक्ष - ०२
  • प्रहार जनशक्ती पक्ष - ०२
  • शेकाप - ०१
  • अपक्ष - ०८
  • एकूण - १६९
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक