शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: ..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; शाहू छत्रपती यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:20 IST

मराठा समाजाचा अंत पाहू नका

कोल्हापूर : आरक्षणासाठी मराठा समाजाने आरपारची लढाई सुरू केली असून, राज्य सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. महायुतीच्या नेत्यांनी बगल न देता आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी सोमवारी पत्रकातून दिला.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत मराठा समाज दिसत नाही. मराठा समाजाची मानसिकता आणि मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार पाहता या आंदोलनाची नोंद गांभीर्याने घेण्याची जबाबदारी आता सरकारवर आहे.घटनेत दुरुस्ती करून ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, ही मागणी आम्ही मराठा मोर्च्याच्या वेळी केली होती. केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवावा, अशी आमची भूमिका आहे. आम्ही या पर्यायावर आजही ठाम आहोत. सरकारने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. या आंदोलनाला वेगळे वळण देऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा नेहमीचा प्रयत्न सरकारने करू नये. कारण मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे.जर सरकार पुन्हा जबाबदारी टाळू लागले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव सरकारने ठेवावी. आरक्षणाचा निर्णय घेताना महाविकास आघाडीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मार्गदर्शन घ्यावे. आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तरी तशी विनंती त्यांना करावी, असेही शाहू छत्रपती यांनी पत्रकात म्हटले आहे.

महायुतीच्या नेत्यांनी बगल देऊ नये..निवडणुकीत मराठा समाज बाजूला जाईल, या भीतीपोटी कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देऊ, अशी वक्तव्ये केली. गेली अनेक वर्षे हीच आश्वासने सातत्याने दिली जात आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी या सरकारची आहे. ही जबाबदारी आता टाळता येणार नाही. सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. महायुतीचे नेते या विषयाला बगल देण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही खासदार शाहू छत्रपती यांनी केला.