राणेंना ताकद पाहायची असेल, तर योग्यवेळी दाखवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:30+5:302021-06-05T04:19:30+5:30

कोल्हापूर : ताकदच पाहायची असेल, तर योग्यवेळी ती दाखवू, असे खासदार संभाजीराजे यांनी ट्वीट करून शुक्रवारी खासदार नारायण ...

If Rane wants to see strength, let's show it at the right time | राणेंना ताकद पाहायची असेल, तर योग्यवेळी दाखवू

राणेंना ताकद पाहायची असेल, तर योग्यवेळी दाखवू

कोल्हापूर : ताकदच पाहायची असेल, तर योग्यवेळी ती दाखवू, असे खासदार संभाजीराजे यांनी ट्वीट करून शुक्रवारी खासदार नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरू होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देवू नये. मात्र, ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही, अशी टीका खासदार राणे यांनी गुरुवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही, तर न्याय देणे आहे आणि ताकदच पाहायची असेल तर योग्यवेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Web Title: If Rane wants to see strength, let's show it at the right time