शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वीजपुरवठा खंडित झाला तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:40 IST

नागरिकांनी संयम बाळगून वीज गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून दोषारोप ठेवण्यापेक्षा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित झाला तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा‘महावितरण’तर्फे आवाहन; विजेपासून अशी काळजी घ्या

कोल्हापूर : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यात कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नागरिक जबरदस्ती करतात. अशा वेळी एक वेळ वीज गेली तर काही वेळाने येते; मात्र एखाद्याचा जीव गेल्यानंतर तो पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून वीज गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून दोषारोप ठेवण्यापेक्षा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.विजेची यंत्रणा ही मोबाईलप्रमाणे सुरू किंवा बंद करता येत नाही. अजूनही ही यंत्रणा मनुष्यावर आधारित आहे. त्यामुळे वीज गेल्यानंतर नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. यासाठी विजेच्या खांबावर चढून दोष नेमका कोठे आहे, तो पाहावा लागतो. अशा वेळी एखादी चूक कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते. लाखो किलोमीटरचे विजेचे जाळे उघड्यावर आहे.ग्राहकाच्या दारापर्यंत वीज आणण्याचे काम सोपे नसते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली, तर एक वाडी, गाव, तालुका, किंबहुना जिल्हा अंधारात जातो. वीज गेल्यानंतर या १९१२, १८००२३३३४३५ व १८००१०२३४३५ टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सेवा २४ तास सुरू आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारेही तक्रार नोंदवू शकता. यासंबंधी वीज बिलाच्या पाठीमागे सूचना केल्या आहेत.ही काळजी घ्या

  •  घरात आरसीसीबी किंवा एलसीबी ब्रेकर बसवून घ्या. तत्काळ वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीज पुरवठा तत्काळ बंद होऊन जीवितहानी टाळता येते.
  •  अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री व तपासणी आवश्यक करा.
  •  वीज उपकरणे, वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित ठेवावीत.
  •  वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घाला. पुरवठा बंद झाल्याची खात्री करा.
  • विद्युत खांबाला किंवा ताणाला जनावरे बांधू नयेत. त्या खाली गोठा किंवा गंजी उभारू नये.
  • वीजपुरवठा खंडित झाल्यास २० मिनिटे थांबूनच कंपनीशी संपर्क साधावा.
  • बिघाड किंवा विजेची तार तुटल्यास त्याची माहिती वीज वितरण कंपनीला त्वरित द्यावी.
  • नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेती पंप, स्टार्टर, वीज मीटरबाबत दक्षता घ्यावी.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर