शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 28, 2023 18:32 IST

ओबीसी मुद्द्यावरून वाद निरर्थक

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून दोन समाजात निरर्थक वाद निर्माण केला जात आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भूजबळ यांना ओबीसी मुद्द्यावरून बोलायचे असे तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रीमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावर बोलावे, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी छगन भूजबळ यांना मंगळवारी घरचा आहेर दिला.मंत्री विखे पाटील हे मंगळवारी अल्पकाळासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसीचा मुद्दा पुढे करून सुरु असलेल्या आंदोलनाची गरजच नव्हती. मराठा आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलतात पण पुढे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. एवढेच असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. मंत्रिमंडळातीलच नेते असे वक्तव्य करत असतील तर सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा संदेश नागरिकांमध्ये जातो. सरकारबाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

शेतकऱ्यांना लवकरच मदतमंत्री विखे पाटील म्हणाले, अवकाळीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिले आहेत. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल. याशिवाय आणखी काही मदत करता येईल का दृष्टीने विचार सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChagan Bhujbalछगन भुजबळRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण