शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 8:31 PM

Religious Places dattamandir Narsobawadi Kolhapur- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात आज श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करणेत आली.

ठळक मुद्देश्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापनाश्री दत्त मंदिर परिसरात श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास प्रारंभ

नृसिंहवाडी/कोल्हापूर :  श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात आज श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करणेत आली.आज पासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी गेले महिनाभर चालू असून येथील दत्त मंदिराच्या उत्तरबाजूस या उत्सवासाठी मंडप व शामियाना उभारणेत आला आहे. आज पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन, सचिन, संदीप कागलकर आणि परिवार या मानकरींच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्य, गजरासह मिरवणुकीने उत्सव मंडपात आणणेत आली. 

घोडे, भालदार, चोपदार, दिवटी, छत्र चामर आणि वाद्यवृंदतसेच दुतर्फा ब्रम्हवृंद, घोडा आदी  मिरवणूकीत सामील झालेने मिरवणुकीची शोभा वाढली होती. नृसिंहवाडी सह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळले व आशीर्वाद घेतले.सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेची वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर उपाध्ये व अवधूतशास्त्री बोरगावकर यांच्या पौरोहित्याखाली गुरुप्रसाद विनायक बडड पुजारी यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. व जगतकल्याणासाठी मातेची प्रार्थना करणेत आली. पूजे नंतर  ऋकसंहिता, ब्राम्हण, अरण्यक, श्री गुरुचरित्र, कृष्णामहात्म्य, श्रीमद् भागवत, श्री सुक्त, रुद्र एकादशिनी, सप्तशती आदी पारायणास आरंभ झाला. 

दुपारी नैवेद्य आरती झालेनंतर तीन वाजता एकविरा भजनी मंडळ यांचे कृष्णा लहरी पठण, चार वाजता वेद शास्त्र संपन्न हरी नारायण चोपदार यांचे पुराण सायंकाळी पाच वाजता कु वैष्णवी जोशी रत्नागिरीयांचे भक्तीसंगीत व रात्रो दहा वाजता ह.भ.प. विवेक गोखले रा.नृसिंहवाडी  यांचे  कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले. संस्कार भारतीच्या रांगोळ्यांनी रस्ते फुललेसंस्कार भारती  नृसिंहवाडी यांनी पूर्ण मिरवणूक मार्गावर घातलेल्या आकर्षक रांगोळी व नयनरम्य गालीच्यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्ते विलोभनीय दिसत होते. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेDatta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूर