कुंथुगिरी येथे आदर्श पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:24 IST2021-09-13T04:24:17+5:302021-09-13T04:24:17+5:30

यावेळी गोकुळ संचालक डॉ.सुजीत मिणचेकर यांनी आई-वडिलांनी दिलेली सुसंस्कृतीची शिदोरी घेऊन, समाजातील चांगल्या गोष्टींना बळ देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून ...

Ideal award distribution at Kunthugiri | कुंथुगिरी येथे आदर्श पुरस्कार वितरण

कुंथुगिरी येथे आदर्श पुरस्कार वितरण

यावेळी गोकुळ संचालक डॉ.सुजीत मिणचेकर यांनी आई-वडिलांनी दिलेली सुसंस्कृतीची शिदोरी घेऊन, समाजातील चांगल्या गोष्टींना बळ देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असून, समाज सुधारणेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे शिक्षकांना पुरस्कार देऊन त्याच्या पाठीवर थाप मारण्याचे काम फाउंडेशन करीत आहे. विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित असणाऱ्या शाळांना अनुदान मिळाले पाहिजे, शिक्षण क्षेत्रामध्ये असणारा असमतोल दूर करण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही कैफियत मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. माजी सभापती राजेश पाटील, शिक्षक नेते दादासो लाड, महेश चव्हाण, जि.प. सदस्य प्रवीण यादव, स्वरूपा शेलार, संजय चौगुलेलेखा मिणचेकर, सार्थ मिणचेकर, रणजीत मिणचेकर, इंद्रजीत मिणचेकर, दीपक पाटील उपस्थित होते.

Web Title: Ideal award distribution at Kunthugiri