इचलकरंजीत ओपन बारवर छापा; २६ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:19+5:302020-12-09T04:21:19+5:30

इचलकरंजी : येथील सहा ठिकाणच्या ओपन बारवर पोलीस उपअधीक्षक व शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी (दि. ७) रात्री छापा टाकला. ...

Ichalkaranjit open bar raid; Action against 26 persons | इचलकरंजीत ओपन बारवर छापा; २६ जणांवर कारवाई

इचलकरंजीत ओपन बारवर छापा; २६ जणांवर कारवाई

इचलकरंजी : येथील सहा ठिकाणच्या ओपन बारवर पोलीस उपअधीक्षक व शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी (दि. ७) रात्री छापा टाकला. यामध्ये २६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील सहाजणांवर उघड्यावर दारू पिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, तर अन्य वीसजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील शेळके मळा, जुना चंदूर रोड, अलायन्स हॉस्पिटल परिसर, संत मळा यासह अन्य दोन ठिकाणी मोकळ्या जागेत मद्य प्राशन करताना हे सर्वजण आढळून आले. दरम्यान, नदीवेस नाका येथे मद्यप्राशन करणाऱ्या सुरेश कृष्णा पाटील (वय ४०, रा. पाटील गल्ली), बसवराज रावतापा मातीन (३३, रा. पाटील मळा), तसेच स्वामी अपार्टमेंट परिसरामध्ये मद्य प्राशन करीत असलेल्या अय्याज बाबासाहेब नदाफ (३०, रा. शहापूर), सचिन बाबूराव कोष्टी (४२), प्रकाश सूर्यकांत नेमाणे (३१), नीलेश राजू सूर्यवंशी (२५, तिघे रा. जवाहरनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: Ichalkaranjit open bar raid; Action against 26 persons