इचलकरंजीत मुसळधार; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ पाणी पातळी ५३ फुटावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:06+5:302021-06-18T04:17:06+5:30
पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट व धोका पातळी ७१ फूट आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा काही ...

इचलकरंजीत मुसळधार; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ पाणी पातळी ५३ फुटावर
पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट व धोका पातळी ७१ फूट आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. रात्रभर मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच राहिली. त्यामुळे गटारी व ओढ्यातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत होते. शहरातील श्रीपादनगरमध्ये गटारी तुडुंब भरून वाहत असल्याने रात्रीच्या सुमारास नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे भागातील नागरिकांनी गटारीचा काही भाग फोडून पाण्याचा निचरा केला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. इचलकरंजी शहरात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असला तरी, पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे.
(फोटो ओळी)
१७०६२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी ५३ फुटांवर पोहोचली आहे.
१७०६२०२१-आयसीएच-०७
पावसामुळे पंचगंगा नदी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
सर्व छाया - उत्तम पाटील