इचलकरंजीत ३९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:38+5:302021-07-07T04:31:38+5:30
इचलकरंजी : शहरात मंगळवारी विविध २८ भागांतील ३९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित मृत्यू संख्या ...

इचलकरंजीत ३९ पॉझिटिव्ह
इचलकरंजी : शहरात मंगळवारी विविध २८ भागांतील ३९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित मृत्यू संख्या शून्य आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राधाकृष्ण चौक, मगदूम मळा प्रत्येकी ४, सिद्धार्थ सोसायटी ३, बोहरा मार्केट, भोनेमाळ, विवेकानंद कॉलनी, विक्रमनगर प्रत्येकी २, आयजीएम रुग्णालयाजवळ, पुजारीमळा, आरगे भवन, मुक्त सैनिक सोसायटी, पाटील गल्ली, प्रियदर्शनी कॉलनी, तोरणानगर, दत्तनगर, कुडचेमळा, कमला-नेहरू हौसिंग सोसायटी, जुना चंदूर रोड, जेकेनगर, स्टेशन रोड, नाईक मळा, बीजेपी मार्केटजवळ, डेक्कन चौकजवळ, यशवंत कॉलनी, गैबान पेट्रोल पंपाजवळ, मुसळे हायस्कूलजवळ, अष्टविनायक अपार्टमेंट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ३१८ जणांना लागण झाली असून, सात हजार ५०३ जण बरे झाले आहेत. ४३५ जण उपचार घेत असून, मृत्युसंख्या ३८० वर स्थिर आहे.