इचलकरंजीच्या तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:25+5:302021-01-08T05:22:25+5:30
जुनी मैत्री व प्रेमसंबंधातून इचलकरंजी येथील तरुणीला मारहाण करून तिच्यावर अत्याच्यार केल्याची घटना घडली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल तारांगणमध्ये बुधवारी ...

इचलकरंजीच्या तरुणीवर अत्याचार
जुनी मैत्री व प्रेमसंबंधातून इचलकरंजी येथील तरुणीला मारहाण करून तिच्यावर अत्याच्यार केल्याची घटना घडली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल तारांगणमध्ये बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडल्याची तक्रार पीडित तरुणीने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली. राकेश शरद गायकवाड (रा. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी व संशयित आरोपी गायकवाड यांच्यात जुने प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच त्याने तरुणीला भेटण्यासाठी हॉटेलवर बोलाविले होते. यावेळी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. धक्काबुक्की केल्याने किरकोळ दुखापत देखील झाली. त्यामुळे पीडित तरुणीने थेट पोलीस ठाण्यात गायकवाड याच्या विरोधात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत संशयिताला अटक झाली नव्हती.