इचलकरंजीच्या ‘शिवम’ बँकेवर अवसायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:23+5:302021-02-05T07:14:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यानंतर सहकार विभागाने बँकेवर अवसायक ...

इचलकरंजीच्या ‘शिवम’ बँकेवर अवसायक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यानंतर सहकार विभागाने बँकेवर अवसायक नियुक्त केला. शिरोळचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांची अवसायक म्हणून नियु्क्ती केली आहे.
शिवम बँक ही इचलकरंजीमधील सक्षम बँक म्हणून ओळखली जायची. मात्र संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बँक आर्थिक अरिष्टात आली. साेलापूर येथील वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती सूतगिरणीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ कोटी ४० लाखांचा, बँकेचे अध्यक्ष अभिजित घाेरपडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत चव्हाण यांच्यासह ३७ जणांवर फसवणुकीचा गु्न्हा दाखल झाला आहे. अशा अनेक प्रकारांमुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ते ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण करू शकत नाहीत. भविष्यात बँकेला आर्थिक व्यवहाराची परवानगी दिली, तर ते ठेवीदारांच्या पैशाची परतफेड करू शकणार नाहीत. यासाठी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने २९ जानेवारी रोजी घेतला.
रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँक अवसायनात काढून त्यावर अवसायकांची नेमणूक केली आहे. अवसायक म्हणून शिरोळचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांची नियुक्ती केली आहे.
डझनभर बँका मोडीत
इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगामुळे बँकिंग व्यवसायाला चांगली संधी आहे. त्यामुळेच स्थानिक बँकांसह बाहेरील बँकांनी मोठ्या प्रमाणात पाय पसरले. मात्र गैरकारभाराचे ग्रहण लागले आणि तब्बल बारा बँका मोडीत गेल्या.