शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

इचलकरंजीचे ज्ञानमंदिर गोविंदराव हायस्कूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:35 IST

अतुल आंबी। लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : इचलकरंजीचे सरकार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सन १८९८ मध्ये गोविंदराव इंग्लिश स्कूलची ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजीचे सरकार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सन १८९८ मध्ये गोविंदराव इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तब्बल १२१ वर्षांचा प्रवास पूर्ण केलेल्या या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ना. बा. एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या या प्रशालेसह मुलींसाठी वेगळी शाळा, पश्चिम महाराष्ट्रांतील पहिली तांत्रिक शिक्षण शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालय ज्ञानदानाचे अविरत कार्य करत आहेत.सात-आठ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या शाळेत सध्या हायस्कूलमध्ये १६८२ व ज्युनिअर कॉलेजमध्ये २१०० असे ३७८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थापनेवेळी ‘गोविंदराव इंग्लिश स्कूल’ असे त्याचे नाव होते. पुढे ‘गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज’ असे नामकरण झाले. गणेश विनायक ढवळे हे पहिले मुख्याध्यापक होते. सन १९१७-१८ मध्ये कृ. वि. ताम्हणकर हे दुसरे मुख्याध्यापक झाले. त्यांच्या कारकिर्दीत सन १९२७-२८ मध्ये दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू केले. विविध व्यवसाय शिक्षणाचीही सुरुवात केली. पुढे सन १९४२ जी. आर. चोळकर हे मुख्याध्यापक असताना तत्कालीन मुंबई प्रांतात प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.सन १९४३ ला श्रीमंत नारायणराव बाबासाहेब यांचे निधन झाले. शाळेसाठी तो काळ थोडा बिकट गेला. १ मार्च १९४९ ला कोल्हापूर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. त्यानंतर सन १९५० मध्ये प्रशालेचे माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी शहरातील धनिकांकडून निधी संकलित केला. त्यावेळी श्रीकृष्ण डाळ्या, एफ. आर. शहा, ज्ञानदेव सांगले, एम. आर. जाधव, वाय. बी. दातार यांनी निधी दिला. त्यानंतर ६ नोव्हेंबर १९५० मध्ये संस्थेची घटना तयार करून संस्थेचे नाव ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे एज्युकेशन सोसायटी’ असे ठेवले. १ जानेवारी १९५२ रोजी शासनातर्फे हायस्कूल श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीस सुपूर्द केले.सन १९६० मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली तांत्रिक शिक्षण शाळेची (टेक्निकल स्कूल) सुरुवात केली. मुलींसाठी म्हणून ‘गोविंदराव हायस्कूल फॉर गर्ल्स्’ अशी वेगळी शाळा सन १९६८ मध्ये सुरू केली. पुढे त्या शाळेला ‘श्रीमंत गंगामाई गर्ल्स् स्कूल’ असे नाव दिले.शाळेने सन १९७५ ला ज्युनिअर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय (आर्टस्, कॉमर्स व सायन्स)ची स्थापना केली. सन १९७९ मध्ये ज्युनिअर विभागासाठी तांत्रिक व व्यवसायिक विभागाची स्थापना केली.सन १९८३ मध्ये व्यंकटेश यांच्या नावाने वाणिज्य शाखेचे महाविद्यालय सुरू केले. सन १९८४ ला ज्युनिअर विभागासाठी द्विलक्ष्मी शिक्षण विभागाचे एमसीव्हीसी (किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण) विभागात रूपांतर केले. सन १९९९ मध्ये बालवाडी व प्राथमिक विभागाची (ना. बा. विद्यामंदिर) स्थापना केली.सध्या लहान गटापासून ते उच्चशिक्षणापर्यंत, तसेच तंत्र शिक्षणासह वाणिज्य शिक्षणापर्यंत सर्व शिक्षणाच्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रशालेमार्फत नारायणराव बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्तही विविध स्पर्धा घेतल्या जातात.संस्थेचे गेल्या चार दशकांपासून उद्योगपती मदनलाल बोहरा हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या दूरदृष्टी व परिश्रमानेही अनेक इमारती पूर्णत्वास आल्या. त्यासाठी त्यांना आजी-माजी पदाधिकाऱ्यांचीही साथ लाभली. सध्या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून हरीष बोहरा कार्यरत आहेत. उपाध्यक्ष उदय लोखंडे, सचिव बाबासाहेब वडिंगे व सर्व विश्वस्त मंडळ हा ज्ञानदानाचा रथ पुढे नेत आहेत.संस्थेचे दिग्गज माजी विद्यार्थीसंस्थेचे अनेक माजी विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यात थोर चित्रकार सरदार पटेल (पी. सरदार), अमेरिकेतील तरुण संशोधक सुभाष खोत, यु.जी.सी.चे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर, संगीतकार आनंद इंगळे, रेडिओ फिक्वेन्सी पेटन्ट घेतलेले आशिष लड्डा, दीनेश काबरा, अमेरिकेत फेसबुक संशोधक विनय भागवत, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह अनेक यशस्वी इंजिनिअर, उद्योगपती, डॉक्टर याचा समावेश आहे.प्रशालेला दिग्गजांच्या भेटीमाजी शिक्षणमंत्री अनंत नामजोशी, साहित्यिक ग. दि. माडगुळकर, इतिहास संशोधक ग. वा. पोतदार, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, आनंद यादव, शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई, हितेंद्र देसाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, फिल्म सृष्टीतील अभिनेते दिलीपकुमार, कमल हसन, हेमामालिनी, आदी दिग्गजांनी प्रशालेला भेटी दिल्या आहेत.