शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

इचलकरंजी महापालिका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे : गारगोटी नगरपालिकेचा प्रस्ताव पाठवा लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इचलकरंजीची लोकसंख्या वाढली आहे. ...

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे : गारगोटी नगरपालिकेचा प्रस्ताव पाठवा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इचलकरंजीची लोकसंख्या वाढली आहे. या निकषावर आणि नागरिकांची मागणी असेल तर इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करु, अशी स्पष्ट ग्वाही नगरविकास मंत्री एकनाश शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. इचलकरंजीतील पाणीपुरवठा योजना, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी देण्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्किट हाऊस येथे जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक झाली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

गारगोटी ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, असे सांगून मंत्री शिंदे म्हणाले, नगरविकास विभागाने यापूर्वी जिल्ह्यासाठी ६७ कोटींचा निधी दिला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात बांधकामविषयी एकच नियमावली असावी, विकासकामांना गती यावी यासाठी राज्यात सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात येत आहे. यामुळे अभिक्षेत्र निर्देशांक (एफएसआय)चा गैरवापर होणार नाही. नागरिकांना बांधकाम परवानग्यांची क्लिष्ट प्रक्रिया करावी लागणार नाही.

महेश पाठक म्हणाले, विकास नियंत्रण नियमावली, बांधकाम परवानग्या ही सगळी प्रणाली ऑनलाईन करण्यात येत असून, आपला प्रस्ताव कुठे व का प्रलंबित आहे, याची नागरिकांना माहिती मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्याठिकाणी घरांसाठी जास्तीचा निधी दिला आहे त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र न मिळाल्याने पुढील टप्प्यातील निधी थांबला आहे. तांत्रिक परवान्यांच्या रकमेची टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामपंचायतींनी ५० टक्के वीजबिल भरल्यास कनेक्शन कापणार नाही शिवाय सवलत दिली जाईल. सध्या पदभरतीची प्रक्रिया स्थगित असल्याने वित्त विभागाने परवानगी दिल्यानंतरच त्याबद्दल कार्यवाही करता येईल.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील शासन स्तरावर मंजूर प्रकल्प, प्रलंबित मागण्या, इचलकरंजी येथे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त प्रकल्प, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्रलंबित कामांचा आढावा, हद्दवाढ याबाबतची माहिती दिली.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी नवीन नगर पंचायतींमध्ये नाेकरभरती करावी, नगररचना विभागात पदभरती करुन कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात व प्रादेशिक उद्यान आराखड्यात दुरुस्ती करावी, अशी सूचना केली. मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पंतप्रधान आवास योजनेचा निधी मिळावा, तांत्रिक मंजुरीची रक्कम कमी करावी, थर्ड पार्टी ऑडिट पूर्ववत करावे, कोरोना योद्धा म्हणून काम करताना निधन झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ५० लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी केली. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांनी शहरात पाणीपुरवठा व पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मिटवण्यासाठी निधीची मागणी केली.

--

ही लोकमागणी आहे का..

खासदार माने यांनी इचलकरंजी महापालिका करण्याची मागणी केली. त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, महापालिकेबाबत आपण जरुर विचार करू. परंतु, तशी नागरिकांची मागणी आहे का की तुम्ही एकटेच मागणी करत आहात. निर्णय घ्यायचा असेल तर लोकांनाही विश्वासात घ्यावे लागेल.

पन्हाळ्यावरील लाईट-साऊंड शोसाठी १२ कोटी

पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी पन्हाळ्यातील पर्यटन विकासांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वावर आधारित लाईट ॲन्ड लेझर, साऊंड शो करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे, त्यासाठी १२ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे सांगितले. या प्रस्तावावर मंत्री शिंदे यांनी टप्प्याटप्प्याने हा निधी देऊ, असे सांगितले.

वडगांवलाही निधी..

वडगांव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी, इचलकरंजीतील शहापूर येथील म्हसोबा देवालयासाठीही निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.

--

फोटो नं ०८०१२०२१-कोल-एकनाथ शिंदे कलेक्ट आढावा बैठक

ओळ : कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे शुक्रवारी झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, प्रधान सचिव महेश पाठक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--