रक्कम दुप्पट करणाऱ्या इचलकरंजीच्या दोघांना अटक
By Admin | Updated: January 1, 2015 00:34 IST2015-01-01T00:31:30+5:302015-01-01T00:34:31+5:30
कागवाड येथील द्राक्ष बागायतदाराला गंडा

रक्कम दुप्पट करणाऱ्या इचलकरंजीच्या दोघांना अटक
निपाणी : रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून द्राक्ष बागायतदाराला गंडा घालणाऱ्या इचलकरंजीच्या दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. संजय सीताराम देशमाने व शिवराज मिरासाबत पठाण अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मुख्य आरोपी देवाप्पा धामणेकर हा फरारी आहे. आण्णाप्पा तावशी (रा. कागवाड) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
द्राक्ष बागायतदार तावशी हे द्राक्ष बागेची माहिती घेण्यासाठी इचलकरंजीला गेले होते. तेथे देवाप्पा धामणेकर, संजय देशमाने यांनी एक लाख रुपये आपणाला दिल्यास त्याचे झटपट दोन लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखविले. तावशी यांनी एक लाख रुपये दिले.
तावशी यांनी तिघांना रकमेची विचारणा करण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. त्यामुळे तावशी यांनी नातेवाईक सदाशिव नागाप्पा तावशी यांना घटनेची माहिती दिली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.