शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

Kolhapur: इचलकरंजीच्या पाणीप्रश्नी सरकारकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न, शहरवासीयांतून तीव्र नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 3:46 PM

विद्यमान आमदार, खासदारांना पाणी प्रश्न भोवणार?

अतुल आंबीइचलकरंजी : शहरासाठी मंजूर केलेली दूधगंगा-सुळकूड योजना कार्यान्वित करण्यासाठी बैठक आयोजित केली असताना त्यामध्ये पुन्हा तज्ज्ञ समिती नेमून चालढकल केली जात आहे. त्यामुळे शहराच्या पाणी प्रश्नावर सरकारकडून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी यावर योग्य निर्णय न झाल्यास विद्यमान आमदार, खासदारांना पाणी प्रश्न भोवणार आहे.

शहराला स्वच्छ व मुबलक पाणी देणार, यावर मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे एकमत आहे; परंतु उपसा करण्यासाठी नदी बदला, असे मत कागलकरांचे आहे. शहराला पाणी देण्यासाठी प्रत्येक वेळी होणारा विरोध चुकीचा आहे, असे मत इचलकरंजीकरांचे आहे. मुळात शासनाच्या वतीने सर्व बाबींचा अभ्यास करूनच या योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर १६५ कोटी निधीची तरतूद केली. या टप्प्यावर विरोध न करता थेट योजना कार्यान्वित करताना विरोध करणे गैर असून, राजकारण बाजूला ठेवत या प्रश्नावर एकमत व्हावे, असे शहरवासीयांचे म्हणणे आहे.दोन्हींकडील जनतेच्या भावना पाहता मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक लावली; परंतु त्यामध्ये योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही, हे इचलकरंजीच्या प्रतिनिधींचे अपयशच आहे.आता पुन्हा तज्ज्ञ समिती नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील चर्चा करून निर्णय होईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. शासन शहराला पाणी देण्यावर ठाम असले तरी इचलकरंजीकरांनी कृष्णेतूनच पाणी घ्यावे, अशी त्यांची भूमिका असल्याचे दिसत आहे. त्यासाठी वारणा, दूधगंगा अशा उपनद्यांवर अवलंबून न राहता शहराने कृष्णेसारख्या मुख्य नदीतून पाणी उपसावे. भविष्यातील शहराची गरज पाहता कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी कृष्णा योग्य आहे. त्यासाठी सध्या उपसा सुरू असलेल्या मजरेवाडी (ता.शिरोळ)च्या दोन किलोमीटर पुढे शिरटी येथून पाणी उपसा करावा. त्यासाठी अत्याधुनिक पाइपलाइन करून मुबलक व शुद्ध पाणी घ्यावे. पाण्याचे नमुने तपासावेत, वॉटर ऑडिट करावे, अशा बाबींचा समावेश आहे.दूधगंगा उपनदी असल्याने परिसरातील गावांना होणारा पाणीपुरवठा जनावरे, चारा, शेती यासाठी पाण्याचे नियोजन पाहता शहरवासीयांनी दूधगंगेचा हट्ट सोडावा आणि शुद्ध व मुबलक पाणी मिळणारा स्रोत म्हणजेच कृष्णा योजना बळकट करावी, असाच सूर सध्या दिसत आहे; परंतु थेट निर्णय घेतल्यास निवडणुकीत विद्यमान सरकारला अडचणीचे ठरणार असल्याने समिती नेमून त्याची धार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

निवडणुकीनंतरच निर्णय शक्यइचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत निर्माण झालेला जटिल प्रश्न सोडविताना कोणीही दुखावले जाणार नाही, याबाबत शासन खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळे वेळ मारून नेत लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.सोशल मीडियावरून तीव्र भावनाविद्यमान खासदार-आमदारांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न, पंचगंगेचे शुद्धीकरण यावर निवडणूक लढवली. आता सुटी नाही, समितीचा निर्णय होईपर्यंत टँकरने शुद्ध पाणी द्या, कोल्हापूरला काळम्मावाडी, इचलकरंजीला का नाही. शासनाच्या अहवालावर विश्वास नाही, अशा विविध संतप्त भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी