इचलकरंजीत काही विद्यमानांना झटका
By Admin | Updated: July 2, 2016 00:36 IST2016-07-02T00:32:10+5:302016-07-02T00:36:47+5:30
३१ प्रभागांचे आरक्षण : इच्छुकांच्या बाजूने दान पडल्यावर आतषबाजी; आशा निराशेचा खेळ रंगला

इचलकरंजीत काही विद्यमानांना झटका
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिहाय आरक्षणांच्या सोडती काढण्यात आल्या. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अशा क्रमाने मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणे जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीसाठी सहा (पैकी तीन महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग सतरा (पैकी नऊ महिला), सर्वसाधारण ३९ (पैकी १९ महिला) अशी आरक्षणे घोषित झाली.
दरम्यान, आरक्षणाच्या सोडतीवेळी इच्छुकांचा आशा निराशेचा खेळ रंगला. या सोडतीत काही नगरसेवकांना हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले.
पालिका सभागृहात सुरुवातीला मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी प्रभागनिहाय, प्रभागांचे चतु:सीमा वाचन केले. त्यानंतर माहिती देताना प्रांताधिकारी जिरंगे यांनी, प्रत्येक प्रभागात ‘अ’ व ‘ब’ असे दोन नगरसेवक असून, त्यापैकी महिला व एक पुरुष असेल, असे सांगितले. त्यानंतर प्रभागातील लोकसंख्येमध्ये अनुसूचित जातींच्या व्यक्तींची संख्या अधिक असेल, असे सहा प्रभाग घोषित केले. या सहा प्रभागांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण घोषित करून त्यापैकी तीन महिला असतील, असे सांगितले. त्यानंतर उर्वरित प्रभागांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या चिठ्ठ्या काढून या प्रवर्गासाठी आरक्षणे जाहीर होतील. त्यातील चिठ्ठ्या काढून महिलांची आरक्षणे जाहीर होतील. बाकी राहिलेल्या प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांच्या सोडती निघतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या सोडती निघाल्यानंतर जाहीर झालेले प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक १ - खंजिरे इस्टेट, सावली सोसायटी, योगाश्रम परिसर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ - शहापूर, आर. के. नगर, तोरणानगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ - कारंडे मळा, सुर्वे मळा, सोलगे मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ४ - कृष्णानगर, दत्तनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ५ - गणेशनगर, आंबेडकरनगर - अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ६ - विकासनगर, दत्तनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ७ - इंदिरा सोसायटी, भारतमाता व केटकाळेनगर - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ - आंबेडकर सोसायटी, कोल्हापूर बेकरी, भाजी मार्केट व व्यंकटेश कॉलनी - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ - शास्त्री सोसायटी, स्वामी कारखाना, मासाळ गल्ली व जोतिबा मंदिर परिसर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १० - फकीर मळा, लिगाडे मळा, कोले मळा, हनुमाननगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ११ - सरस्वती हायस्कूल, महावीर कॉलनी, शास्त्री सोसायटी, स्वामी मळा - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२ - कामगार चाळ, इंडस्ट्रियल इस्टेट, भोने माळ, निमजगा माळ - अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ - जयभीम झोपडपट्टी, कापड मार्केट, मुक्त सैनिक सोसायटी - अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १४ - हिरकणी हॉटेल, वर्धमान चौक, म्हसोबा गल्ली, नगारे मळा - नागरिकांचा प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक १५ - शांतीनगर, लाखेनगर, इंदिरानगर, आरगे भवन - अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला).
प्रभाग क्रमांक १६ - मधुबन हौसिंग, पारिजात हौसिंग, बोहरा मार्केट, येलाज व स्वामी मळा -नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक १७ - आसरानगर, साईट क्रमांक १०२, निशिगंध व वृंदावन कॉलनी - अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक १८ - झेंडा चौक, अवधुत आखाडा, पीर मळा, पी.बा.पाटील मळा - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १९ - मंगळवार पेठ, सुतार मळा, खंजिरे मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २० - लालनगर, नारायणनगर, भाग्यश्री कॉलनी - अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला.)
प्रभाग क्रमांक २१ - वखार भाग, नेहरूनगर, नारायण पेठ - नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक २२ - अण्णा रामगोंडा शाळा, गोकुळ चौक, आयजीएम हॉस्पिटल, गोसावी झोपडपट्टी - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २३ -विवेकानंद कॉलनी, कलानगर, बंडगर माळ, साईट नं. ९५ - नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक २४ - कमला नेहरू हौसिंग, यशवंत कॉलनी, महेश कॉलनी, पुजारी मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २५ - सुर्वे मळा, संग्राम चौक, घोडके माळ, लायकर मळा - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक २६ - बावणे गल्ली, हत्ती चौक, कागवाडे मळा, डॉ. राजेंद्रप्रसाद रोड - नागरिकांचा प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २७ - लायकर गल्ली, मोठे तळे, नाट्यगृह, झेंडा चौक परिसर - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २८ - गुरूकन्ननननगर, लंगोटे मळा, दातार मळा व कोकरे मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक २९ - बाळनगर, तांबे माळ, कुलकर्णी मळा, चंदूर रोड, आवाडे मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३० - तनंगे मळा, श्रीपादनगर, मरगुबाई मंदिर, पटेकरी गल्ली, जामदार गल्ली - सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३१ - बौद्धविहार, जैन बस्ती, नदीपीर दर्गा, राम मंदिर, अनुबाई कन्या शाळा, शेळके गल्ली - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण.
‘कही खुशी-कही गम’
प्रभाग रचना व त्यामध्ये सोडत पद्धतीने टाकण्यात आलेली आरक्षणे जाहीर होताच काही विद्यमान नगरसेवक व काही इच्छुक उमेदवारांची नाराजी झाली.
त्याचप्रमाणे काही इच्छुकांच्या अपेक्षेप्रमाणे आरक्षणे पडल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
चिठ्ठ्या उचलण्याची तिघांना संधी
प्रभागनिहाय आरक्षणे काढण्यासाठी प्रभाग क्रमांकाच्या केलेल्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी सभागृहात तीन लहान मुले उपस्थित होती. त्या तिघांनाही चिठ्ठ्या उचलण्याची संधी देण्यात आली. कुणाल कुमार सोनवणे, राणी अरविंद कदम व यश नितीन लायकर यांच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या.