इचलकरंजीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST2021-08-25T04:28:41+5:302021-08-25T04:28:41+5:30

मंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अनुषंगाने शिवसैनिकांनी पक्ष कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज ...

Ichalkaranji Shiv Sena's Jode Maro Andolan | इचलकरंजीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

इचलकरंजीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

मंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या अनुषंगाने शिवसैनिकांनी पक्ष कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला. त्यावेळी राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला बांगड्या घालून दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस व शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही. तसेच कोल्हापुरात फिरण्याचे धाडस केल्यास कोल्हापुरी हिसका दाखवला जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महादेव गौड, नगरसेवक रवींद्र माने, सयाजी चव्हाण, आनंद शेट्टे, धनाजी मोरे, मंगला मुसळे, शोभा गोरे, मधुमती खराडे, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

फोटो ओळी

२४०८२०२१-आयसीएच-०७

इचलकरंजीत शिवसेनेच्या वतीने मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

Web Title: Ichalkaranji Shiv Sena's Jode Maro Andolan