इचलकरंजी रोटरी क्लब ११ अवॉर्डने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST2021-09-23T04:25:44+5:302021-09-23T04:25:44+5:30

इचलकरंजी : सन २०१८-२० मध्ये रोटरी क्लब आॅफ इचलकरंजीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटरीचे गर्व्हनर डॉ. गिरीश मसूरकर (बागलकोट) ...

Ichalkaranji Rotary Club honored with 11 awards | इचलकरंजी रोटरी क्लब ११ अवॉर्डने सन्मानित

इचलकरंजी रोटरी क्लब ११ अवॉर्डने सन्मानित

इचलकरंजी : सन २०१८-२० मध्ये रोटरी क्लब आॅफ इचलकरंजीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटरीचे गर्व्हनर डॉ. गिरीश मसूरकर (बागलकोट) यांनी क्लबला ११ बेस्ट अवॉर्ड देऊन गौरविले. हा कार्यक्रम हुबळी येथे पार पडला.

अण्णासाहेब पोवाडी यांना बेस्ट प्रेसिडेंट, सचिव सत्यनारायण धूत यांना बेस्ट सेक्रेटरी म्हणून गौरविण्यात आले. प्रांतपाल गौरीष धोंड (गोवा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अवॉर्ड वितरण करण्यात आले. क्लबला बेस्ट इन क्लब सर्व्हिस, बेस्ट इन व्होकेशनल सर्व्हिस, बेस्ट इन इंटरनॅशनल सर्व्हिस, बेस्ट इन कम्युनिटी सर्व्हिस, बेस्ट इन पब्लिक रिलेशन, बेस्ट इन लिट्रसी प्रमोशन, बेस्ट क्लब बुलेटिन असे पुरस्कार मिळाले. कार्यक्रमास प्रकाश रावळ, संजय घायतिडक, वसंत पाटील, नेमीनाथ कोथळे, अभय यळरुटे, सागर पाटील, मिलिंद कडतारे, चंद्रकांत मगदूम, संतोष पाटील, शीतल चौगुले, मुकेश जैन उपस्थित होते.

Web Title: Ichalkaranji Rotary Club honored with 11 awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.