बोरगाव घटनेचा इचलकरंजीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:52+5:302021-08-27T04:27:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव (माळेवाडी) येथील मातंग समाजाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत दहन करण्यास विरोध करण्यात ...

Ichalkaranji protests against Borgaon incident | बोरगाव घटनेचा इचलकरंजीत निषेध

बोरगाव घटनेचा इचलकरंजीत निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव (माळेवाडी) येथील मातंग समाजाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत दहन करण्यास विरोध करण्यात आला. या जातीयवादी प्रवृत्तीचा, तसेच याची दखल न घेणाऱ्या जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांचा इचलकरंजीतील भारतीय दलित महासंघाच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले.

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील ही घटना निंदनीय आहे. राज्यात दलित समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारात वाढ होत आहे. याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात पापालाल इंगळे, चंद्रकांत काळे, श्रीकांत कांबळे, राजेंद्र दाभाडे, विशाल खांडेकर, अर्जुन साळुंखे, विजय लोखंडे, आदी सहभागी झाले होते.

Web Title: Ichalkaranji protests against Borgaon incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.