शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Crime: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानेच केला बापाचा खून, पत्नी व मुलीस पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:15 IST

इचलकरंजी : डोक्यात गज घालून मुलीने बापाचा खून केल्याची घटना काल, मंगळवारी (दि.२२) इचलकरंजी घडली होती. याप्रकरणी पोलीस तपासात ...

इचलकरंजी : डोक्यात गज घालून मुलीने बापाचा खून केल्याची घटना काल, मंगळवारी (दि.२२) इचलकरंजी घडली होती. याप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पत्नी व मुलीचे बाहेर प्रेमसंबंध  असल्याने कुटुंबात झालेल्या वादातून शांतीनाथ केटकाळे यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.याप्रकरणी पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पत्नी सुजाता व मुलगी साक्षी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.मृत शांतीनाथ केटकाळे आपल्या कुटुंबासह गांधी विकासनगर परिसरात रहात होते. पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघींचे बाहेर कोणाशी तरी प्रेम सबंध सुरू असल्याची माहिती त्यांना समजली. या कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात वारंवार वाद निर्माण होत होते.काल, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पुन्हा शांतिनाथ केटकाळे यांचा पत्नी सुजाता व मुलगी साक्षीसोबत वाद झाला. या वादाच्या रागातूनच संतापलेल्या सुजाता व साक्षी यांनी शांतीनाथ केटकाळे यांचा कायमचा काटा काढण्यासाठी त्यांच्या डोक्यात कटावणी व बॅटने वर्मी घाव घातला.या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पत्नी व मुलगी पोलिसात हजर झाल्या. यावेळी दोघींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. आम्हीच शांतीनाथ केटकाळे यांचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तपासानंतर या दोघींना अटक करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख हे करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजी