शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीला १०७७ कोटी जीएसटी परतावा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:01 IST

मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचना

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी)चा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्यामुळे एक हजार ७७ कोटी रुपये महापालिकेला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. इचलकरंजीमुळे जालना महापालिकेलाही याचा फायदा होणार आहे.नगरपालिकेचे महापालिकेमध्ये रूपांतरण झाल्यानंतर सहायक अनुदानाऐवजी महापालिकांना वस्तू व सेवा कराचा परतावा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, दोन वर्षे लोटली तरी महापालिकेला वस्तू व सेवा कराचा परतावा मिळालेला नव्हता. शासनाकडून जानेवारी २०२५ अखेर एक हजार ७७ कोटी ८९ लाख २८ हजार ९७४ रुपये येणे बाकी आहे. आमदार राहुल आवाडे यांनी वस्तू व सेवा कराचा परतावा मिळावा, यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी मुंबईत बैठक लावली होती.आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, वित्त व लेखाधिकारी विकास कोळपे यांनी, महापालिकेला परतावा देणे किती महत्त्वाचे आहे, तसेच प्रत्येक महिन्याला परतावा देण्याच्या यादीत इचलकरंजीचा समावेश करावा, आदी बाबी पटवून दिल्या. आपली मागणी रास्त आहे.यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पवार यांनी संबंधित खात्याला दिल्या. जालना महापालिकेचीही मागणी असल्याने त्यांचाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज, अपर मुख्य सचिव गुप्ता, उपसचिव श्रीकांत आंडगे, सचिव शैला ए, माजी आमदार प्रकाश आवाडे, आदी उपस्थित होते.

महापालिकेला मोठा दिलासा मिळणारमहापालिकेने मागणी केल्याप्रमाणे शासनाने रक्कम दिल्यास मोठा फायदा होणार आहे. विविध विकासकामे शहरात सुरू आहेत. महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी काही रक्कम लागणार आहे. तसेच ठेकेदारांची देणी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही देणी द्यायची आहेत. या सर्व गरजा भागवून सुमारे ६०० कोटी रुपये शिल्लक राहण्याची शक्यता आहे. या रकमेच्या व्याजातून शहरातील अनेक कामे करता येतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीGSTजीएसटी