इचलकरंजी माकपतर्फे केंद्र सरकारविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:48+5:302021-06-18T04:17:48+5:30
इचलकरंजी : पेट्रोल व डिझेलची दरवाढ, शेतकरीविरोधी तीन काळे रद्द करा, खाद्यतेलासह अन्य १४ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सवलतीच्या दरात ...

इचलकरंजी माकपतर्फे केंद्र सरकारविरोधात निदर्शने
इचलकरंजी : पेट्रोल व डिझेलची दरवाढ, शेतकरीविरोधी तीन काळे रद्द करा, खाद्यतेलासह अन्य १४ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सवलतीच्या दरात रेशनवर मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले.
निवेदनात, केरळ शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वत्र अंमलबजावणी करावी. कामगारविरोधी संहिता रद्द करून पूर्वीच्याच कायद्याला संरक्षण द्यावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. आरोग्य व्यवस्था पूर्णत: मोफत करावी, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कमजोर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून सामान्य जनतेच्या हाताला काम नाही व पोटाला अन्न मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या सर्व प्रश्नवर केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी माकपातर्फे इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, दत्ता माने, भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी
१७०६२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत माकपतर्फे केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.