इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST2021-03-13T04:44:22+5:302021-03-13T04:44:22+5:30
इचलकरंजी : येथील नाईट कॉलेजची विद्यार्थिनी प्रफुल्लराणी कोठावळे हिने बी.ए. स्नातकातून ८७.५० टक्के गुण मिळवून मेरिट लिस्टमध्ये द्वितीय क्रमांक ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी : येथील नाईट कॉलेजची विद्यार्थिनी प्रफुल्लराणी कोठावळे हिने बी.ए. स्नातकातून ८७.५० टक्के गुण मिळवून मेरिट लिस्टमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल तिचा संस्थेचे अध्यक्ष अरुण खंजिरे यांनी प्रमाणपत्र, शिल्ड व बुके देऊन तिचा सत्कार केला. यावेळी बी. एस. मुरदंडे, प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
महिला कांडी कामगारांना अपघात विम्याचे कवच
इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने परिसरातील महिला कांडी कामगारांचा मोफत अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. आमदार प्रकाश आवाडे महिला कांडी कामगार सुरक्षा विमा कवच या नावाने ही योजना आहे. दि ओरियंटल इन्शुरन्स कंपनीची विमा पॉलिसी सुरू करण्यात येणार आहे. तरी महिला कांडी कामगारांनी २० मार्चपर्यंत नावनोंदणी पॉवरलूम असोसिएशनमध्ये करावी, असे आवाहन केले आहे.