इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:53+5:302021-06-04T04:18:53+5:30
जीवनावश्यक साहित्यांचे वाटप इचलकरंजी : येथील स्वरतरंग संगीत अकॅडमीतर्फे कलाकारांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कलाकारांच्या ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
जीवनावश्यक साहित्यांचे वाटप
इचलकरंजी : येथील स्वरतरंग संगीत अकॅडमीतर्फे कलाकारांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कलाकारांच्या कुटुंबांना व गरजू कलाकारांना जीवनावश्यक साहित्यांचे किट देण्यात आले. या वेळी सोमनाथ रसाळ, आर. बी. व्यास, एस. वाय. कोरे, अरुण केटकाळे आदी उपस्थित होते.
पंचगंगा नदीघाटावर स्वच्छता अभियान
इचलकरंजी : प्रमोद बचाटे युवा शक्ती व युवा ग्रुपच्यावतीने पंचगंगा नदीघाट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केल्याबद्दल भाजपने स्वच्छता मोहीम हाती घेतली. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी भेट दिली. मोहिमेमध्ये अध्यक्ष प्रमोद बचाटे, विजय चव्हाण, राजेंद्र पाटील, डॉ. राजू पुजारी, अभिजित पाटील, राहुल सावंत, वॉर्ड इन्स्पेक्टर बबन कांबळे आदींनी सहभाग घेतला.