इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:17+5:302021-05-10T04:23:17+5:30
इचलकरंजी : येथील आनवेकर फिटनेस क्लबच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी : येथील आनवेकर फिटनेस क्लबच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे संस्थापक सचिन आनवेकर यांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी रक्तदानाचे कार्य पार पाडले. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्तिक बचाटे, राकेश डेक्कनावर, सचिन हावळ, आशुतोष नागवेकर यांनी परिश्रम घेतले.
पाईपलाईनला गळती
कबनूर : येथील फॅक्टरी रोडवरील जयभवानी कॉर्नर या ठिकाणी पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्यच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. येथे अनेक दिवस मोठा खड्डा काढून ठेवलेला आहे. अनेक तज्ञ प्लंबराना लिकेज निघत नाही आणि रस्त्यावर खड्डा तसाच आहे. खड्ड्यामध्ये पाणी भरलेले असते. अपघात होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित प्रशासनाने मोठी दुर्घटना होण्यापूर्वी गळती काढून हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.