इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:04+5:302021-04-03T04:21:04+5:30

इचलकरंजी : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरील रस्त्यावर वाळूमिश्रित खडी पसरली आहे. ...

Ichalkaranji Brief News | इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरील रस्त्यावर वाळूमिश्रित खडी पसरली आहे. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. हा मुख्य चौक असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरील रोडवर दुभाजक बसविण्याचे काम सुरू आहे. तेथे बांधकामाचे साहित्य मध्येच टाकल्याने वाळूमिश्रित खडी पसरली आहे. त्यामुळे वाहनधारक घसरत आहेत. याचा त्रास होत असून, रस्त्यावर पसरलेली वाळूमिश्रित खडी काढून टाकावी, अशी मागणी होत आहे.

उन्हाच्या तीव्रतेने इचलकरंजीतील रस्ते ओस

इचलकरंजी : शहर व परिसरात शुक्रवारी दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत होता. एप्रिल महिन्याची सुरुवात होताच उन्हाच्या चटक्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गासह भागातील रस्त्यावरील वाहतूक तुरळक प्रमाणात दिसत होती. दुपारचे तापमान साधारण ३८ सेल्सिअसपर्यंत गेले होते. अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी शीतपेयांवर, तर थंडगार फळफळावळ खाण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती.

रस्ता करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : दत्तनगर ते डेक्कन मिल परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात किरकोळ अपघात होत आहेत. तरी हा रस्ता लवकर करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Ichalkaranji Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.