इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:36+5:302021-03-26T04:24:36+5:30
इचलकरंजीत चार पॉझिटिव्ह इचलकरंजी : शहरातील विविध तीन ठिकाणी चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये भोनेमाळ, रिंग रोड व ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
इचलकरंजीत चार पॉझिटिव्ह
इचलकरंजी : शहरातील विविध तीन ठिकाणी चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये भोनेमाळ, रिंग रोड व हत्ती चौक परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या चार हजार १२४ वर पोहोचली असून, तीन हजार ८७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ५६ जणांवर उपचार सुरू आहेत. मृत्यू संख्या १९५ वर स्थिर आहे.
तरुणाची आत्महत्या
इचलकरंजी : गणेशनगर येथील एका तरुणाने राहत्या घरी लोखंडी तुळईस ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सोमेश राजशेखर जळकोटी (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबतची वर्दी चंदनकुमार रेवन साताळगावकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आज उपोषण
इचलकरंजी : केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे तसेच पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज, शुक्रवारी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयाजवळ उपोषण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेस समितीजवळ उपोषण करण्यात येणार आहे.