इचलकरंजी -८३.३३ कोटींची गुंतवणूक

By Admin | Updated: August 18, 2014 23:34 IST2014-08-18T22:45:15+5:302014-08-18T23:34:36+5:30

पॉवरलूम मेगा क्लस्टर : जिल्हाधिकारी, वस्त्रोद्योग आयुक्ताकडून प्रकल्पाची पाहणी

Ichalkaranji-83.33 crores investment | इचलकरंजी -८३.३३ कोटींची गुंतवणूक

इचलकरंजी -८३.३३ कोटींची गुंतवणूक

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगात आधुनिकता आणण्याबरोबरच निर्यातीत उच्च दर्जाचे कापड उत्पादन, त्याचे विपणन, आदींसाठी लागणाऱ्या पायाभूत सेवा-सुविधा पुरविणाऱ्या पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पाच्या उभारणीची पाहणी जिल्हाधिकारी राजाराम माने, वस्त्रोद्योग आयुक्त एस. बालाराजू, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आदींनी केली. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ८३.३३ कोटी रुपये खर्चाची गुंतवणूक होणार असून, यंत्रमाग क्षेत्रातील सायझिंग, विणकाम, प्रोसेसिंग व विपणन या चारही घटकांना त्यांनी भेटी दिल्या.
केंद्र सरकारने इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पास तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली असून, तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पॉवरलूम मेगा क्लस्टरसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली होती. योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी येथील डीकेटीईला क्लस्टर व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार संस्था म्हणून नियुक्त केले आहे. डीकेटीईने या प्रकल्पाचा सविस्तर विकास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८३.३३ कोटी रुपये खर्चाची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचे ६० टक्के व सहभागी होणाऱ्या घटक संस्थांची ४० टक्के रक्कम असणार आहे.
इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये व त्यानंतर ८ आॅगस्ट २०१४ रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधितांच्या बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये
पहिल्या टप्प्यात ८३.३३ कोटी रुपयांचे प्रस्ताव राबविण्याचा निर्णय
घेतला होता. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी माने, वस्त्रोद्योग आयुक्त बालाराजू, प्रकाश आवाडे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. ए. आय. वासीफ, प्रोसेसिंग असोसिएशनचे गिरीराज मोहता, पीडीएक्सएलचे संचालक सुनील पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे सतीश कोष्टी, आॅटोलूम असोसिएशनचे गोरखनाथ सावंत, इंजिनिअरिंग असोसिएशनचे सुहास अकिवाटे, कापड मार्केटचे महेश त्रिपाठी, आदींच्या पथकाने डीकेटीई, यशवंत प्रोसेसर्स, स्टेशन रोडवरील लक्ष्मी प्रोसेसर्सची जागा, आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranji-83.33 crores investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.