शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मी आघाडीसोबत जाणार नाही, त्यांनी पाठिंबा द्यावा; राजू शेट्टींचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 16:57 IST

'त्यांना खोटा प्रचार करण्यासाठी वाव देणार नाही'

दत्तवाड : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे इंडिया आघाडीचे धोरण चांगले आहे. इंडिया आघाडीने मला पाठिंबा द्यावा, परंतु मी आघाडीबरोबर जाणार नाही. कारण मी आघाडीबरोबर गेलो तर भाजपवाले मी कारखानदाराबरोबर गेलो असा खोटा प्रचार करतात. त्यांना खोटा प्रचार करण्यासाठी वाव देणार नाही. यासाठी आघाडीने उमेदवार उभा न करता मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.दत्तवाड (ता. शिरोळ) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. देशभर इंडिया आघाडीने भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याचे ठरविले आहे. यासाठी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तेजस्विनी यादव, अखिलेश यादव व राहुल गांधी यांच्यात समेट झाला आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरून महाराष्ट्रातदेखील भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना हरविण्यासाठी भाजप विरोधात एकच उमेदवार देण्याचे धोरण ठरविले आहे. मात्र, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यावर शेट्टी म्हणाले, मी आघाडीबरोबर जाणार नाही. आघाडीने माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा.

यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच नूर काले, बसगोंडा पाटील, मलगोडा पाटील, एन.एस. पाटील, विवेक चौगुले, सुनील नेजे, अजित चौगुले, शामराव सुतार, शीतल सुरवसी, तेजस वराळे, प्रवीण सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टी