चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची माहिती माझ्याकडे : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:48+5:302021-05-11T04:24:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीतील प्रचारात केलेल्या आराेपाबाबत जिल्हा न्यायालयात ...

I have information about Chandrakant Patil's assets: Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची माहिती माझ्याकडे : हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची माहिती माझ्याकडे : हसन मुश्रीफ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीतील प्रचारात केलेल्या आराेपाबाबत जिल्हा न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा सुरू आहे. त्याच्या निकालानंतर त्यांची सगळी संपत्ती विकून भरतात की काय, हे बघू. मात्र त्यांची माया (संपत्ती) कोठे आहे, याची आपणास माहिती असल्याचा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पाडण्याची स्वप्ने बघू नयेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनुकरण करावे, असा टाेलाही त्यांनी लगावला.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, हा आभास असल्याची टीका केल्याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुंबईचे आयुक्त चहल यांनी चांगले व्यवस्थापन करून कोरोना रोखण्यात यश मिळविले. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. मग न्यायालय व मोदी हे आभास आहेत का? फडणवीस यांनी राजकारण करत बसण्यापेक्षा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे अनुकरण करावे. सारखे पुन्हा येईन... पुन्हा येईन... म्हणून कोणी सत्तेवर येत नसते. चुकीच्या आरोपामुळे गेले दीड वर्ष काम करणारी आराेग्य व पाेलीस यंत्रणा नाउमेद होते, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: I have information about Chandrakant Patil's assets: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.