मी निवडणूक रिंगणातच, अफवांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:48+5:302021-03-26T04:22:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोकुळमध्ये मी केलेल्या कामाबाबत काही बोलता येत नसल्याने माझ्या आजारपणावरून विरोधक वावड्या उठवत आहेत. ...

मी निवडणूक रिंगणातच, अफवांवर विश्वास ठेवू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळमध्ये मी केलेल्या कामाबाबत काही बोलता येत नसल्याने माझ्या आजारपणावरून विरोधक वावड्या उठवत आहेत. मी निवडणुकीच्या रिंगणातच असणार आहे. सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे खुलासावजा आवाहन गुरुवारी गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव होऊ घातलेल्या निवडणुकीत उमदेवारी दाखल करणार नसल्याच्या चर्चेला पूर्णविराम देत आपटे यांनी आता माझी प्रकृती सुधारली आहे. गेल्या महिन्याभरापासून बैठकांना व नियमित कामकाजातही सहभाग वाढवला आहे, असे निवेदनातून स्पष्ट केले आहे. हे सांगताना आपटे यांनी, दूध संस्थांनी गेली ३५ वर्षे मोठे सहकार्य मिळाले असल्याचे आणि येथून पुढेही देत राहू, असे म्हटले असल्याने माझी दावेदारी निश्चित आहे. त्यामुळे आजारपणावरून विनाकारण सभासदांमध्ये गैरसमज पसरवू नयेत आणि सभासदांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले.