शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अडकूरकरांच्या प्रेमाने हुसेनजी भारावले..., ग्रामस्थांची कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:43 IST

गावच्या विकासासाठी दिलेल्या निधीची आठवण जपत अडकूर ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा हृद्य सत्कार केला. १० वर्षापूर्वी केलेल्या मदतीबद्दल अडकूरकरांनी दाखविलेली कृतज्ञता आणि प्रेम पाहून हुसेनजी भारावून गेले.

ठळक मुद्देअडकूरकरांच्या प्रेमाने हुसेनजी भारावले...! : १० वर्षापूर्वी दिलेल्या निधीची ठेवली जाण

गडहिंग्लज : गावच्या विकासासाठी दिलेल्या निधीची आठवण जपत अडकूर ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा हृद्य सत्कार केला. १० वर्षापूर्वी केलेल्या मदतीबद्दल अडकूरकरांनी दाखविलेली कृतज्ञता आणि प्रेम पाहून हुसेनजी भारावून गेले.अडकूर (ता. चंदगड) येथील छ. शिवाजी चौक सुशोभिकरण, पीकअप शेड व रस्ता डांबरीकरणासाठी हुसेन यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाच्या कारकीर्दीत १० लाखांचा विकासनिधी दिला होता. त्याबद्दल त्यांचा सरपंच यशोदा कांबळे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील हेही यावेळी उपस्थित होते.हुसेन म्हणाले, कांही मंडळींना कालच्या मदतीची आज जाणीव नसते. अशा काळात अडकूर ग्रामस्थांनी आठवणीने गावी बोलावून घेवून केलेल्या सन्मानामुळे मला खूप आनंद झाला. राज्यातील आघाडी सरकार आणि आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून यापुढेही आपण अडकूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू.यावेळी उपसरपंच अनिल कांबळे, माजी सभापती बबन देसाई, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनिलराज सूर्यवंशी, महावितरणचे संचालक अभिजीत उर्फ बॉबी भोसले, शेतकरी संघटनेचे कृष्णराव रेगडे, गणेश दळवी, अडकूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भेकणे, कादर कोवाडकर, शमीम शेख आदींसह ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी..!मीरा भार्इंदर महापालिकेचे माजी शिक्षण सभापती व अडकूरचे सुपूत्र सुरेश दळवी यांच्या आग्रहापोटी हुसेन यांनी हा निधी दिला होता. त्यामुळे कोकण दौऱ्यावर जाताना त्यांनी आवर्जून अडकूरला भेट दिली आणि आपल्या निधीतून झालेल्या विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

शेळ्यांच्या गोठ्याला भेटकोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या स्थानिक तरूणांच्या मार्गदर्शनासाठी सुरेश दळवी यांनी अडकूरमध्ये सुरू केलेल्या उस्मानाबादी शेळीपालन गोठा आणि चंदगड तालुका संघाचे संचालक अभय देसाई यांनी महिलांच्या रोजगारासाठी सुरू केलेल्या काजू प्रक्रिया प्रकल्पालाही हुसेन यांनी आवर्जून भेट दिली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर