शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी गेली... पतीनेही सोडला काही क्षणातच प्राण, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; शाहूवाडी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 11:30 IST

दाम्पत्याने असा एकाचवेळी जगाचा निरोप घेतल्याने पंचक्रोशीत हळहळ

येळवण जुगाई : पत्नीच्या निधनानंतर पतीने काही क्षणांतच प्राण सोडण्याची घटना बुधवारी सकाळी मांजरे (तालुका शाहूवाडी ) येथे घडली. ममताबाई शंकर पोवार  व पती शंकर बाबू पोवार असे या दाम्पत्याचे नाव आहे. दाम्पत्याने असा एकाचवेळी जगाचा निरोप घेतल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त झाली.

ममताबाई पोवार यांचे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निधन झाले. त्यांचा एक मुलगा कामानिमित्त मुंबईत असल्याने व नातू गोव्याहून येत असल्याने गावकरी त्यांची वाट पाहत होते. त्यांना गावी पोहोचण्यात सायंकाळचे साडेसात वाजले. सर्व विधी आटोपून मृतदेह उचलत आजारी असलेले त्यांचे पती शंकर पोवार यांनीही प्राण सोडला. पती-पत्नीची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली व एकाच चितेवर दोघांना अग्नी देण्यात आला.या दोघांनी वैवाहिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले होते. कशाला ही न डगमगता संसाराचा गाडा चालवला होता. दोन्ही मुले व एक मुलगी यांचा विवाह केले. एक मुलगी मतिमंद असल्याने तिचा सांभाळ हेच करत होते; पण पत्नीच्या मृत्यूचा धक्का मात्र पतीस असाह्य झाला. वारकरी संप्रदायातील पोवार दाम्पत्याच्या अशा या मृत्यूमुळे पती-पत्नीमधील नाते मृत्यूनंतरही कायम राहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर