कोनोली तर्फ असंडोलीत दरड कोसळून पती-पत्नींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:06+5:302021-07-24T04:16:06+5:30

धामणी खोऱ्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्याने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ...

Husband and wife die due to pain in Asandoli towards Conoli | कोनोली तर्फ असंडोलीत दरड कोसळून पती-पत्नींचा मृत्यू

कोनोली तर्फ असंडोलीत दरड कोसळून पती-पत्नींचा मृत्यू

धामणी खोऱ्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्याने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने कोनोली पैकी कुपलेवाडी येथे डोंगराचे भूस्खलन झाले. कोसळलेला डोंगराचा भराव दोन घरावर आदळल्याने घरे जमीनदोस्त झालीत. ही घटना समजताच रात्री ग्रामस्थांनी बचाव कार्य सुरू केले. मात्र जोरदार पाऊस, सर्वत्र असणारी पूरपरिस्थिती आणि अंधार यामुळे बचावकार्यात मर्यादा आल्या. शुक्रवार सकाळपासूनच पुन्हा बचावकार्य सुरू केले. मात्र जेसीबी यंत्र मिळविण्यास वेळ झाल्याने दुपारच्या सुमारास मृतदेह शोधून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. वसंत कुलपे यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ऐन बेंदूर सणाच्या रात्री शेतकरी दाम्पत्यासह जनावरांचे होत्याचे नव्हते झाले.

Web Title: Husband and wife die due to pain in Asandoli towards Conoli