आजाराला कंटाळून पती-पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST2021-03-06T04:23:37+5:302021-03-06T04:23:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील मौनी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव बाळू भांदिगरे (वय ६२), सुरेखा ...

आजाराला कंटाळून पती-पत्नीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील मौनी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव बाळू भांदिगरे (वय ६२), सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय ५७) या पती-पत्नीने आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची भुदरगड पोलिसांत नोंद झाली.
आकुर्डे येथील भांदीगरे दाम्पत्य आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. आज सकाळी घरात कोणीही नसताना दोघांनी राहत्या घरालगत असलेल्या छपरातील वाश्याला दोरी लावून सदाशिव यांनी तर पत्नी सुरेखा यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद झाली आहे. गारगोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांचा भाऊ निवृत्ती बाळू भांदिगरे यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अतिशय शांत आणि मनमिळाऊ असलेल्या भांडीगरे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.