तौउते चक्रीवादळामुळे नागरिक गारठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST2021-05-17T04:23:08+5:302021-05-17T04:23:08+5:30
उचगाव : वादळी पावसाने ग्रामीण व शहर भागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी गारठून गेले आहेत. रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या ...

तौउते चक्रीवादळामुळे नागरिक गारठले
उचगाव : वादळी पावसाने ग्रामीण व शहर भागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी गारठून गेले आहेत. रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे लहान मुले, वयोवृद्ध, आजारी रुग्ण गारठून गेले आहेत. या वादळाच्या हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी नियंत्रण कक्षातून वादळाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या स्थितीचा कोविड केंद्रांवर कसलाही परिणाम होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासने दिल्या आहेत.
दरम्यान तौउते चक्रीवादळाचा इम्पॅक्ट हा ग्रामीण भागातील शेतकरी वर्गावर झाला आहे. वादळी पावसाचा उपयोग शेतकऱ्यांना मशागतीच्या कामी येत आहे. वादळी पावासामुळे काही ठिकाणी कौलारू घरांची कौले, सिमेंटचे पत्रे, वाऱ्याने उडून गेले आहेत. तर मोठ्या वृक्षामुळे जमिनीतून वादळ उपसून टाकत आहे. यामुळे परिणामी धोका निर्माण झाला आहे.